Advertisement

मुंबईकर 'धावले' आरे वाचवायला!


मुंबईकर 'धावले' आरे वाचवायला!
SHARES

गोरेगाव पूर्वेकडील आरे काॅलनी म्हणजे मुंबई उपनगराचं फुफ्फुस. इथली वनसंपदा उपनगरातील रहिवाशांना शुद्ध हवेचा पुरवठा करण्याचं काम कैक वर्षांपासून इमानएतबारे करतं असली, तरी नियत फिरलेल्या मनुष्य जमातीने विकासकामांच्या नावाखाली या नैसर्गिक संपत्तीवरच घाला घालण्याचं काम सुरू केलं आहे. परिस्थिती काहीही असो, पण आरेतील हिरवळ टिकली पाहिजे या उदात्त हेतूने 'मुंबई रोड रनर्स' आणि 'आरे टायगर्स' या संस्थंतर्फे रविवारी 'सेव्ह आरे रन'चं आयोजन केलं होतं. या 'रन'मध्ये मुंबईतल्या कानाकोपऱ्यातील शेकडो धावपटूंनी सहभागी होऊन आरे काॅलनीतील झाडांची कत्तल थांबवण्याचा संदेश दिला.

'सेव्ह आरे रन' तीन प्रकारांत आयोजित करण्यात आली होती. या 'रन'मध्ये 'वाॅकिंग', 'सायकलिंग' आणि 'रनिंग' अशा तीन सेगमेंटचा समावेश होता. या तिन्ही प्रकारांमध्ये २०० हून अधिक जणांनी सहभाग घेतला होता. तर तितकेच मुंबईकर त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी या आरे काॅलनीत उपस्थित होते.

सकाळी ६.३० वाजता ही 'रन' सुरू झाली असली, तरी आयोजनापासून सर्व व्यवस्था पाहणाऱ्यांची वर्दळ इथं सकाळी ५ वाजेपासूनच सुरू होती. स्पर्धकांची गर्दी होऊ लागताच, थंडी असूनही इथल्या वातावरणात अनोखी उर्जा जाणवू लागली. त्यानंतर प्रत्यक्षात 'रन' सुरू झाल्यावर प्रत्येक सहभागी व्यक्तीने 'सेव्ह आरे'चा नारा दिला. काही जणांनी निषेध नोंदवण्यासाठी काळ्या रंगाचे कपडेही परिधान केले होते.

एकूण २ ते १६ किमी अंतराच्या 'रन'मध्ये सहभागी होऊन प्रत्येकाने जनजागृती करण्यासोबतच निसर्गाचाही मनमुराद आस्वादही घेता. सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास 'रन' अधिकृत संपल्याची घोषणा करण्यात आली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा