Advertisement

मुलुंड जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत लाखोंची बक्षिसं


मुलुंड जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत लाखोंची बक्षिसं
SHARES

मुलुंड जिमखाना, राज्य मानांकन, कॅरम स्पर्धा, मुलुंड, महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटना,
मुलुंड जिमखान्यातर्फे तसेच महाराष्ट्र कॅरम आसोसिएशन आणि मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने १४ ते १६ एप्रिलदरम्यान मुलुंड जिमखाना, नवघर रोड, मुलुंड (पूर्व) येथे राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. 

महिला एकेरी व पुरुष एकेरी अशा दोन गटांमध्ये रंगणाऱ्या या स्पर्धेतील पहिल्या ८ विजेत्यांना तब्बल १ लाख १० हजारांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. पुरुष गटातील विजेता २५ हजार रुपयांचा तर महिला गटातील विजेती ८ हजार रुपयांची मानकरी ठरणार आहे.


सामन्यांचे थेट प्रक्षेपण

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने उपांत्यपूर्व फेरीपासूनच्या काही सामन्यांचे चित्रीकरण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या यूट्यूब चॅनलवरून करण्यात येणार आहेत. अंतिम फेरीच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या फेसबुक, वेबसाईट व यूट्यूब चॅनलवरून करण्यात येणार आहे.


येथे करा नोंदणी

स्पर्धेची नियमावली महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून संलग्न जिल्यातील खेळाडूंनी स्पर्धेत नावे नोंदविण्यापूर्वी त्याची माहिती करून घेणे आवश्यक आहेस्पर्धेचे प्रवेश अर्ज www.maharashtracarromassociation.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी खेळाडूंनी आपापल्या जिल्ह्यांमार्फात आपल्या प्रवेशिका महाराष्ट्र कॅरम असोसिशनकडे ६ एप्रिलपर्यंत नोंदवाव्यात.



हेही वाचा - 

कार्याध्यक्ष चषक कॅरम स्पर्धेत काजल कुमारीला विजेतेपद


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा