मुंबई एफसीने केली सेंट्रल बॅंकेवर मात

 Mumbai
मुंबई एफसीने केली सेंट्रल बॅंकेवर मात
Mumbai  -  

मुंबई - मुंबई एफसी अंडर - 19 ने शानदार खेळी करत 110 व्या आरसीएफ-नाडकर्णी कप फुटबॉल टूर्नामेंटमध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियावर 2-0 ने मात केली. ही मॅच चेंबूरच्या आरसीएफ कॉलनीत खेळली गेली. पैट्रिक मैस्करेनहासने खेळात महत्त्वपूर्ण खेळी केली. तसंच उमेश पेराम्ब्रा आणि सोहेल खत्री या दोघांनी प्रत्येकी (45 मिनिटं) आणि (65मिनिटं) दोन गोल केले.

तर , सेंट्रल बँकेने चांगली सुरुवात केली खरी पण, खेळाडू गोल करु शकले नाहीत. तसंच एका दुसऱ्या खेळात मुंबई सीमा शुल्क संघाने मध्य रेल्वेला 3-1 ने हरवलं. सीमा शुल्क संघाच्या खेळाडू फ्रांसिस्को सलिनने 7 व्या मिनिटाला गोल केला.

Loading Comments