फुटबॉल नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मुली अव्वल

Churchgate
फुटबॉल नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मुली अव्वल
फुटबॉल नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मुली अव्वल
See all
मुंबई  -  

चर्चगेट - फुटबॉल नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये चर्चगेटच्या कुपरेज मैदानात शनिवारी 7 जानेवारीला झालेल्या 4 अंतिम सामन्यांनी रंजक आणली होती. रिलायंस फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या ही स्पर्धा 31 डिसेंबर ते 7 जानेवारी दरम्यान खेळवली गेली. या फुटबॉल स्पर्धेत 20 लाख खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये 164 मुलींचे संघ तर 240 सरकारी संस्थाही सहभागी झाल्या होत्या. यात मुलींनी बहरदार कामगिरी केली. तर फादर अॅग्नेल मल्टिपरपस स्कूल मुंबई आणि रोजरी उच्चमाध्यमिक स्कूल गोवा यांच्यात झालेल्या सामन्यात अखेरच्या क्षणापर्यंत कोण विजयी ठरणार याबात उत्सुकता लागून होती. 15 मिनिटात डागलेल्या गोलमुळे मुंबईतील फादर अॅग्नेल मल्टीपर्पस स्कूलने 1-0 असा विजय मिळवला. तर लहान मुलांच्या खेळात चावबाघा एचएस कोलकाता आणि सिक्रेट हर्ट एचएसएस कोचीचा सामना एकतर्फी झाला. या स्पर्धेच्या दरम्यान बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चन यासह रिलायंस फाऊंडेश च्या संचालिका नीता अंबानी उपस्थित होत्या.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.