Advertisement

'मुंबई महापौर श्री' ला तीन लाखांचं बक्षीस


'मुंबई महापौर श्री' ला तीन लाखांचं बक्षीस
SHARES

तरुण मंडळी नेहमीच शरीरसौष्ठव स्पर्धेकडे आकर्षित होतात. त्यातच महापौर श्री या स्पर्धेकडे दरवर्षी सर्वांचे लक्ष लागलेले असते. तीच जिल्हास्तरीय स्पर्धा येत्या 22 एप्रिल रोजी लोअर परळ येथील ललित कला भवनमध्ये रंगणार आहे. स्थानिक आमदार सुनील शिंदे आणि शिवबा प्रतिष्ठानच्या सहकार्याने ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतल्या विजेत्याला 51 हजाराचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. तर सात गटात होणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येक गटात 30 हजाराचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. तर अन्य चार क्रमांकांना 8, 6, 4 आणि 2 हजारांचे बक्षीस दिले जाणार आहे. तसेच गतविजेत्याला 10 हजारांचा पुरस्कार दिला जाणार आहे. त्याचबरोबर बेस्ट पोझरला देखील पुरस्कार दिला जाईल.

मुंबई महानगरपालिका नेहमीच शरीरसौष्ठवपटूंच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली आहे आणि भविष्यातही राहील. मुंबईचे, देशात तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव उंचावणाऱ्या खेळाडूंच्या कामगिरीची दाखल पालिका निश्चित घेईल 

- विश्वनाथ महाडेश्वर, महापौर

त्याचप्रमाणे खेळाडूंच्या नोकरीचा प्रश्न मार्गी लावण्याचं यावेळी सांगण्यात आलं. या स्पर्धेच्या निमित्ताने शरीरसौष्ठव संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापौरांची भेट घेतली. या ग्लॅमरस खेळाला कमी निधी असतो तरी संघटनेच्या वतीने स्पर्धेच्या आयोजनात कोणतीही उणीव भासू देत नाही, असे अध्यक्ष अजय खानविलकर यांनी सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा