Advertisement

पिकलबॉल स्पर्धेत गौरव, दिव्याची बाजी


पिकलबॉल स्पर्धेत गौरव, दिव्याची बाजी
SHARES

18 वर्षांखालील मुंबई पिकलबॉल स्पर्धेत गौरव ओछानी आणि दिव्या सरैय्या यांनी बाजी मारली आहे. मुंबई पिकलबॉल संघटना आणि ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशनच्या वतीने गुरूवारी विलेपार्लेच्या डहाणूकर कॉलेज येथे ही स्पर्धा पार पडली. अटीतटीच्या लढतीत दिव्याने भक्ती आडिवरेकरचा 11-8, 11-7 असा पराभव केला. तर मुलांमध्ये गौरवने प्रतिस्पर्धी प्रणव डोईफोडेला 11-5, 11-8 ने पराभूत करत मुलांच्या एकेरी गटात विजेतेपद पटकावले.

पिकलबॉल म्हणजे नेमकं काय?
तीन खेळांचे मिश्रण असलेला हा खेळ लॉन टेनिस, टेबल टेनिस आणि बॅडमिंटन या तीन खेळांच्या मिश्रणातून बनला आहे. हा खेळ खेळण्यास खूप सोपा जरी असला तरी अधिक आव्हानात्मक आहे. तसेच या खेळात वयाची मर्यादा नाही. यामध्ये 4 वर्षांपासून ते अगदी 65-70 वर्षांपर्यंतचे लोक खेळू शकतात. तसेच या खेळात जे पॅडल वापरले जाते ते टेबल टेनिसमध्ये वापरल्या जाणाऱ्या पॅडल सारखे आहे. यामध्ये प्लॅस्टिकच्या चेंडूचा वापर होतो. त्यामुळे जास्त जोरही द्यावा लागत नाही. बॅडमिंटनच्या आकाराच्या कोर्टवर हा खेळ खेळला जातो. तसेच याची रचना ही लॉन टेनिसप्रमाणे आहे. टेबल टेनिसच्या पॅडलने, बॅडमिंटनच्या कोर्टवर लॉन टेनिसचा खेळ खेळणे म्हणजेच पिकलबॉल. अमेरिकेच्या एका खासदाराने या गेमची सुरुवात केली. तसेच गेल्या दहा वर्षांपासून हा भारतातही खेळला जातो आणि आज भारतातील 20 पेक्षा अधिक राज्यात या खेळाचा प्रसार झालेला आहे. सुरुवातीला मुंबईत या खेळाचा प्रसार झाला होता. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा खेळ पोहोचलेला आहे. तसेच या खेळात भारताने आतंरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर यशदेखील मिळवलेलं आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा