मुंबईकर खेळाडूंची दक्षिण कोरियात चमकदार कामगिरी!

  Mumbai
  मुंबईकर खेळाडूंची दक्षिण कोरियात चमकदार कामगिरी!
  मुंबई  -  

  दक्षिण कोरियात झालेल्या तायक्वांदो स्पर्धेत मुंंबईकर मुलांनी चमकदार कामगिरी केली आहे. वर्ल्ड कल्चर एनस्पो तायक्वांडो अजिंक्यपद स्पर्धेत मुंबईतल्या खेळाडूंनी सात सुवर्ण, चार कांस्य आणि 11 रौप्य पदकांची कमाई केली आहे.

  तायक्वांदो स्पर्धेतील पुमसे प्रकारात 13 वर्षाखालील मुलांच्या गटात आरव पेंटर आणि अर्णव अत्रे यांनी सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. सिदक चावलाने रौप्य पदक पटकावले आहे. 16 वर्ष वयोगटातील ऋषभ दीक्षितने देखील सुवर्ण पदक पटाकवले आहे. ही स्पर्धा जयेश व्हेलाळ यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. मुलांच्या 10 वर्ष वयोगटात निलय झवेरी, निधी जगासिया आणि सावेर सिंग यांनी रौप्यपदक पटकावले आहे. 8 वर्ष वयोगटात रेयांश धवन आणि राजवीर कोच्चर यांच्यासह 35 वर्ष वयोगटातल्या विनित सावंत यांनी रौप्य पदक मिळवले. याच गटातील निशांत शिंदेने कांस्य पदकाची कमाई केली आहे.  हेही वाचा -

  आंतरराष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत महाराष्ट्र अव्वल


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.