• आंतरराष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत महाराष्ट्र अव्वल
  • आंतरराष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत महाराष्ट्र अव्वल
  • आंतरराष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत महाराष्ट्र अव्वल
SHARE

धारावी - भारतरत्न राजीव गांधी क्रीडा संकुलात तिसऱ्या आंतरराष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. 25 ते 27 नोव्हेंबरला झालेल्या या स्पर्धेत सौदी अरेबियाच्या खेळाडूंसह भारतातील 475 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 8 ते 40 वयोगटातील खेळाडूंनी भाग घेतला होता.

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सर्वोत्तम प्रदर्शन करीत ५० सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं. झारखंडला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. तर गुजरातला पदक तालिकामध्ये तिसरं स्थान मिळालं. प्रमुख पाहुणे म्हणून सौदी अरेबियाचे ग्रॅड मास्टर नाझी आणि मेजर नंदकुमार नेरुरकर यांना प्रमुख पाहुणे म्हणूंन आमंत्रित करण्यात आलं होतं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या