Advertisement

मुंबईत रंगणार जगातील श्रीमंत अांतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा


मुंबईत रंगणार जगातील श्रीमंत अांतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा
SHARES

अायअायएफएल वेल्थ मुंबई अांतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा मुंबईत ३० डिसेंबरपासून रंगणार अाहे. फिडेच्या नियमांनुसार नऊ फेऱ्यांमध्ये स्विस-लीग पद्धतीने खेळवली जाणारी ही स्पर्धा वांद्रे-कुर्ला संकुलातील माउंट लिटेरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये होणार अाहे. खुल्या गटात अाणि १३ वर्षांखालील गटात होणाऱ्या या स्पर्धेत अनुक्रमे १२ लाख अाणि ८ लाख रुपयांची पारितोषिके दिली जाणार अाहेत. १३ वर्षांखालील गटातील सर्वाधिक किंमतीची बक्षिसं देणारी ही जगातील सर्वात श्रीमंत अांतरराष्ट्रीय स्पर्धा ठरणार अाहे.


२० पेक्षा जास्त ग्रँडमास्टर्सचा सहभाग

१३ वर्षांखालील गटात बिगरमानांकित खेळाडूंना संधी दिली जाणार असून खुल्या गटात मात्र फिडे मानांकित बुद्धिबळपटू सहभागी होणार अाहेत. जवळपास २० ग्रँडमास्टर्सनी या स्पर्धेसाठी अापला सहभाग निश्चित केला अाहे. त्यात भारताचा अभिजित गुप्ता, रशियाचा इव्हान रोझूम, अमेरिकेचा तिमूर गॅरेयेव्ह, इटलीचा डेव्हिड अल्बर्टो या ग्रँडमास्टर्ससह भारताची महिला अांतरराष्ट्रीय मास्टर श्रीजा शेशाद्री सहभागी होणार अाहे.


जवळपास २१ देशांमधील बुद्धिबळपटूंनी या स्पर्धेत भाग घेतला असून त्यात २० ग्रँडमास्टर्सचा समावेश अाहे. मात्र अाम्ही १३ वर्षांखालील स्पर्धेवर अधिक लक्ष केंद्रित केले अाहे. या मुलांना अापले कर्तृत्व दाखविण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांच्यातील उपजत गुणांना वाव देण्यासाठी अाम्ही त्यांच्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले अाहे.
- प्रफुल झवेरी, इंडियन चेस स्कूलचे संस्थापक

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा