Advertisement

मुंबई-खंडाळा सायकल शर्यतीचा थरार


मुंबई-खंडाळा सायकल शर्यतीचा थरार
SHARES

हौशी सायकलिंग असोसिएशन अाॅफ बाॅम्बे सबर्बन डिस्ट्रिक्ट तसेच महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १४ जानेवारीला जायंट स्टारकिन अशोक खेळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मुंबई ते खंडाळा सायकल शर्यतीचे अायोजन करण्यात अाले अाहे. ८० किलोमीटर अंतराची ही स्पर्धा एलिट अाणि हायब्रीड अशा दोन गटांमध्ये रंगणार अाहे.


असा असेल मार्ग

खार-स्टारकिन येथून सुरुवात होणाऱ्या या सायकल शर्यतीचा मार्ग एसव्ही रोड, वांद्रे, माहिम, शिवसेना भवन, टिळक ब्रिज, दादर टीटी, सायन, चेंबूर असा असेल. त्यानंतर चुनाभट्टी, चेंबूर, वाशी, पनवेल, खोपोली अाणि भोर घाटाच्या शेवटी बोगदा संपल्यानंतर या शर्यतीचा समारोप होईल. या शर्यतीत समता नगर (पनवेल, टोल नाका) ते भाेर घाट असा एकच प्राइम असणार अाहे.


बक्षिसं किती?

घाटांचा राजा म्हणून अोळखल्या जाणाऱ्या अशोक खळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही स्पर्धा अायोजित केली जाते. या स्पर्धेतील एलिट गटातील विजेत्याला ३० हजार अाणि हायब्रीड गटातील विजेत्याला १५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. अधिक माहितीसाठी हौशी सायकलिंग असोसिएशन अाॅफ बाॅम्बे सबर्बन डिस्ट्रिक्टचे अध्यक्ष गजेन गानला (९८२०४९०१००) अाणि सचिव डॉ. अमोल गानला (९८२०१५४१००) यांच्याशी संपर्क साधावा.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा