Advertisement

राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत विकास धारियाला अजिंक्यपद


राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत विकास धारियाला अजिंक्यपद
SHARES

महाराष्ट्र कॅरम असोसिएशन अाणि कोल्हापूर जिल्हा हौशी कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने अायोजित करण्यात अालेल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत मुंबईच्या कॅरमपटूंचा बोलबाला पाहायला मिळाला. महिलांमध्ये मुंबईच्या अायेशा मोहम्मदने बाजी मारल्यानंतर पुरुषांमध्येही मुंबईच्या विकास धारियाने जेतेपद पटकावण्याची करामत केली.


योगेश धोंगडेवर मिळवला विजय

तीन सेटपर्यंत रंगलेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात विकास धारियाने मुंबईच्याच राज्य चॅम्पियन ठरलेल्या योगेश धोंगडेला पराभूत करून विजेतेपद पटकावले. विकासने ही लढत १७-१५, ५-२५, २५-७ अशी जिंकली. विजेत्या विकासला २५ हजार रुपये अाणि दत्तराज चषक देऊन गौरवण्यात अाले.


झैद अहमदला तिसरे स्थान

तिसऱ्या-चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात ठाण्याच्या झैद अहमदने मुंबईच्या अमोल सावर्डेकरला १३-२१, २५-७, २५-१ असे हरवले. तत्पूर्वी, उपांत्य फेरीच्या सामन्यात विकासने अमोल सावर्डेकरवर मात करून अंतिम फेरी गाठली होती तर योगेशने झैद अहमदला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला होता.


हेही वाचा -

अायेशा मोहम्मदने जिंकली राज्य मानांकन कॅरम स्पर्धा

राहुल द्रविडचा 'हाॅल अाॅफ फेम’मध्ये समावेश



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा