Advertisement

अंधेरीत रंगली रोलबॉल स्पर्धा


अंधेरीत रंगली रोलबॉल स्पर्धा
SHARES

वर्सोवा - शालेय राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धेत कोल्हापूरचा संघ विजयी ठरलाय तर मुंबई संघानं चौथं स्थान पटकावलंय. या स्पर्धेत महाराष्ट्रातले 14, 17 आणि 19 या वयोगटातले एकूण 18 संघ सहभागी झाले होते. सर्व विजेत्यांना पारितोषिकं देऊन सन्मानित करण्यात आलंय. वर्सोवा येथील सेंट मेरीज हायस्कूलच्या मैदानात 4 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा झाली. क्रीडा युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर आणि मुंबई उपनगर रोलबॉल संघटना यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement