गोवा इंटरनॅशनल सेलिंग चॅम्पियनशीपवर उपमन्यूची मोहोर

  Mumbai
  गोवा इंटरनॅशनल सेलिंग चॅम्पियनशीपवर उपमन्यूची मोहोर
  मुंबई  -  

  मुंबई - गोवा इंटरनॅशनल सेलिंग वीक या चॅम्पियनशिपमध्ये मुंबईच्या आयएनडब्ल्यूटीसी संघाचं प्रतिनिधित्व करणारा उपमन्यू दत्ता विजेता ठरला.

  उपमन्यूने त्याच्या श्रेणीत पहिले तीन दिवस चांगले प्रदर्शन करत उत्तम कामगिरी केली. उपमन्यूने 13 गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. तर त्याच्या सोबत असलेल्या दिलीप कुमारने 27 गुणांवर दुसरा क्रमांक मिळवला आणि इस्त्रराज अलीने (28 गुण) तिसरा क्रमांक पटकावला. दिलीप आणि इस्त्रराज ईएमईएसएचे प्रतिनिधित्व करत होते. तर दक्षिण कॅलिफोर्निया विश्वविद्यालयात वीटरबी कॉलेजमध्ये इंजीनियरिंगचं शिक्षण घेणारा उपमन्यू लॉस एंजेलिसहून या चँम्पियनशिपमध्ये सहभागी झाला होता.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.