Advertisement

मुस्कान, ऋषभ ठरले उत्कृष्ट जलतरणपटू


मुस्कान, ऋषभ ठरले उत्कृष्ट जलतरणपटू
SHARES

मुंबई अमॅच्युअर अ‍ॅक्वेटीक असोसिएशन आतंरशालेय ज्युनियर स्विमिंग स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या गटात धिरुभाई अंबानी शाळेच्या मुस्कान पटेल आणि मुलांच्या गटात क्वीन मेरी शाळेच्या ऋषभ चौबे या दोघांनी बाजी मारली आहे. मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशनतर्फे आयोजित केलेली ही स्पर्धा बोरीवली स्पोर्टस् कॉम्प्लॅक्स येथे झाली.

या स्पर्धेत मुंबईतील अनेश शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. मुस्कान या स्पर्धेत ५० मीटर आणि १०० मीटरमधील फ्री स्टाईल, ब्रेस्ट स्ट्रोक, इंडिव्हिज्युअल मेडल, बटरफ्लाय आणि बॅक स्ट्रोक प्रकारत एकूण सहा वेळा सुवर्ण पदक मिळवत चमकदार कामगिरी केली आहे. दरम्यान, ऋषभने देखील ६ इव्हेंटपैकी ५ इव्हेंटमध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे. तर १०० मीटरच्या ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये धिरुभाई अंबानी शाळेच्या क्रिश मेहताने ऋषभला मागे टाकत बाजी मारली.


Muskaan-all smiles_2.JPG


'हे' स्पर्धक ठरले सुवर्ण पदकाचे मानकरी

या आंतरशालेय स्पर्धेत मुली आणि मुलांच्या अंडर १९, १७, १५, १३, ११, ९ आणि ७ वयोगटातील मुलांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मुलींच्या ७ वर्षे वयोगटात तीआरा सिंग हिने ३ सुवर्ण पदक, तर १ रौप्य पदकाची कमाई केली, तर मुलांच्या गटात शरय भल्ला याने १ सुवर्ण पदक, १ रौप्य पदक आणि १ कांस्य पदकाची कामाई करत शानदान कामगिरी केली.

मुलींच्या १९ वर्ष वयोगटात सीडनहॅम कॉलेजच्या महिमा भातखांडे हीने ४ सुवर्ण पदक मिळवले तर, १५ वर्ष वयोगटात करीना शंक्ता हिने ३ सुवर्ण, तर २ रौप्य पदक मिळवले. १३ वर्षे वयोगटात अपेक्षा फर्नांडीस हिने ५ सुवर्ण पदकासहित एका रौप्य पदकाची कमाई केली, ११ वर्षे वयोगटात अनुष्का सालसकर हिने ४ सुवर्ण पदक आणि ९ वर्ष वयोगटात अनन्या नायक हीने ३ सुवर्ण आणि २ रौप्य पदक मिळवले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा