Advertisement

विहंग खो-खो स्पर्धेच्या पुरुषांमध्ये नवमहाराष्ट्र संघाची बाजी


विहंग खो-खो स्पर्धेच्या पुरुषांमध्ये नवमहाराष्ट्र संघाची बाजी
SHARES

एेरोलीतील राधिकाबाई मेघे विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या मनिष स्मृति चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत पुण्याच्या नवमहाराष्ट्र संघाने अजिंक्यपदावर नाव कोरले. महाराष्ट्र खो-खो असोसिएशन अाणि ठाणे जिल्हा खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नवमहाराष्ट्र संघाने यजमान विहंग क्रीडा मंडळाचा १४-१२ असा २ गुणांनी पराभव करून विजेतेपदावर नाव कोरले.


मध्यंतरानंतर सामन्याला कलाटणी

मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ केला. त्यामुळे मध्यंतराला ७-७ अशी बरोबरी होती. पण दुसऱ्या डावातील अाक्रमणात नवमहाराष्ट्रने विहंगचे ७ गडी बाद केले, त्यापैकी ४ गडी एकमेव मयुरेश साळुंखेने टिपले. त्यानंतर संरक्षणाच्या डावात पुण्याच्या प्रतिक वाईकर अाणि अक्षय गणपुलेने प्रत्येकी २.१० मिनिटे संरक्षण करत एका संस्मरणीय विजयाची नोंद केली. या दोघांनी पहिल्या डावातही संरक्षणात दमदार कामगिरी केली होती. विहंगच्या महेश शिंदेची दुसऱ्या डावातील ३ मिनिटांची खेळी व्यर्थ ठरली. तिसऱ्या क्रमांकासाठी खेळविण्यात अालेल्या सामन्यात, महात्मा गांधी स्पोर्टस अकादमीने हिंद केसरी संघाचा १३-१० असा ३ गुणांनी पराभव केला.


हे ठरले स्पर्धेत सर्वोत्तम -

सर्वोत्कृष्ट संरक्षक - अक्षय गणपूले )नवमहाराष्ट्र संघ, पुणे)
सर्वोत्कृष्ट आक्रमक - मयुरेश साळुंखे (नवमहाराष्ट्र संघ, पुणे)
सर्वोत्कृष्ट अष्टपैलू - महेश शिंदे (विहंग क्रीडा मंडळ, ठाणे)
लक्षवेधी खेळाडू - अभिषेक केरीपाळे (हिंद केसरी, सांगली)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा