SHARE

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने चिपळूण येथे २३ डिसेंबरपासून होणाऱ्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेसाठी मुंबई उपनगर खो-खो संघाची धुरा निहार दुबळे अाणि अारती कदम यांच्याकडे सोपवण्यात अाली अाहे.


राज्यभरातून मुला-मुलींचे प्रत्येकी २३ जिल्हासंघ या स्पर्धेत सहभागी होणार अाहेत. या स्पर्धेतून मणिपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी राज्याचा संघ निवडला जाणार अाहे. स्पर्धेचं उद्घाटन युवासेनेचे प्रमुख अादित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार अाहे.


मुंबई उपनगरचा कुमार संघ - निहार दुबळे (कर्णधार), दीपेश खेराडे, ओमकार सोनावणे, तेजस टक्के, सत्येश चाळके, सुरज पाटील, सिद्धेश थोरात, सौरभ रहाटे, मोहित खंडागळे, मनीष खारवी, अनिकेत चेंदवणकर, प्रथमेश दुर्गेवले.


कुमारी संघ - आरती कदम (कर्णधार), रचना जुवळे, अक्षता कदम, साक्षी वाफेलकर, आकांक्षा कौचे, साक्षी जाधव, श्वेता जाधव, साक्षी सोनावणे, दिशा भारती, ग्रीष्मा माईन, मनाली काजारे, वर्षा कदम.


संबंधित विषय
ताज्या बातम्या