Advertisement

आमदार नगरसेवक चषक कबड्डी स्पर्धेला उत्तम प्रतिसाद


आमदार नगरसेवक चषक कबड्डी स्पर्धेला उत्तम प्रतिसाद
SHARES

ओम भारत क्रीडा मंडळ खार (पूर्व) या संस्थेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या आमदार नगरसेवक चषक कबड्डी स्पर्धेला १८ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. यामध्ये पुरुषांचे १६ आणि महिलांचे १५ असे मुंबई उपनगर जिल्ह्यातील ३१ अव्वल संघ सहभागी होत आहेत. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मंगळवार १८ एप्रिलला मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी शिवसेनेचे आमदार अनिल परब, आमदार तृप्ती सावंत, प्रज्ञा धुपकर आणि चंद्रशेखर वायंगणकर हे नगरसेवक उपस्थित असणार आहेत. ही स्पर्धा मॅटवर डे-नाईट खेळवण्यात येत असल्याने उपनगरातील संघांना त्या निमित्ताने आपले तंत्र आणि कसब चांगल्या प्रकारे दाखवण्याची संधी प्राप्त होणार आहे.

गतवर्षीही स्पर्धेला मॅट उपलब्ध करून देत आयोजकांनी खेळाच्या प्रगतीला अग्रक्रम दिला होता. स्पर्धेच्या कालावधी दरम्यान प्रेक्षकांची नेहमीच चांगली उपस्थिती लाभते हे विशेष. महिलांना बसण्याची विशेष व्यवस्था असल्याने त्यांचीही लक्षणीय उपस्थिती असते.

स्पर्धेत सहभागी होणा-या संघांची नावे


पुरुष संघ
महिला संघ
सन्मित्र (घाटकोपर)
संजीवनी (भांडुप)
सह्याद्री (जोगेश्वरी)
ओम नव महाराष्ट्र (बोरीवली)
चेंबूर क्रीडा केंद्र
अश्विनी (मरोळ)
सागर (सांताक्रूझ)
महात्मा फुले (घाटकोपर)
श्री सिद्धी (गोरेगाव)
आराध्य (चुनाभट्टी)
संघर्ष (गोरेगाव)
श्री साई (घाटकोपर)
पंचवटी (घाटकोपर)
सत्यम (कांजुरमार्ग)
ओम साई (बोरीवली)
नवशक्ती (चेंबूर)
पोयसर जिमखाना (कांदिवली)
शिवनेरी (घाटकोपर)
अभिनव (गोरेगाव)
भवन्स (अंधेरी)
साहसी (चेंबूर)
नेताजी सुभाषचंद्र बोस (कांदिवली)
मुलुंड क्रीडा केंद्र
चेंबूर क्रीडा केंद्र
स्वामी समर्थ (जोगेश्वरी)
विशाल (कुर्ला)
पार्ले स्पोर्ट्स
सन्मित्र (घाटकोपर)
वीर परशुराम (घाटकोपर)
स्वराज्य (घाटकोपर)
नव महाराष्ट्र (बोरीवली)


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा