ओमकार, योगेशची मुंबई कबड्डी संघात निवड

 Lower Parel
ओमकार, योगेशची मुंबई कबड्डी संघात निवड

लोअर परळ - कबड्डीच्या विश्व चषकात भारताची निराशाजनक सुरुवात झाली असली तरी, लोअर परळ विभागात कबड्डी प्रेमींमध्ये आनंदाची लहर पसरली आहे. या विभागातील एस. जी. एस. क्रीडा मंडळातील छत्रपती पुरस्कार विजेते विलास जाधव यांचे सुपुत्र ओमकार जाधव आणि विजय नवनाथ क्रीडा मंडळाचा योगेश सुर्वे कबड्डी मुंबई शहर पुरुष(प्रौढ गट)संघात निवड करण्यात आली आहे. सांगलीत होणाऱ्या राज्य स्तरीय अजिंक्य पद कबड्डी स्पर्धेत हे दोघेही मुंबई संघातून खेळणार आहेत. त्यामुळे मुंबई शहर असोसिएशन आणि विभागातील सर्व मंडळाकडून दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले जात आहे.

Loading Comments