Advertisement

मुंबईत रंगणार पॅरा स्पोर्ट्सचा थरार!


मुंबईत रंगणार पॅरा स्पोर्ट्सचा थरार!
SHARES

मुंबईत पहिल्यांदाच पॅरा स्पोर्ट्सचा थरार रंगणार आहे. एकता वर्ल्ड आणि हॅपी फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र पॅरा स्पोर्ट्स स्पर्धेचं आयोजन येत्या २६ ते २८ नोव्हेंबरदरम्यान खार जिमखाना येथे पार पडणार आहे. या स्पर्धेत १२, १५ आणि १८ वर्षांखालील मुले आणि मुली सहभागी होऊ शकतात. यामध्ये 8 क्रीडा प्रकार हे वैयक्तिक आहेत तर दोन क्रीडा प्रकार ग्रुपमध्ये खेळवले जातील. महाराष्ट्र पॅरा स्पोर्ट्समुळे मुंबईसह राज्यातील दिव्यांग मुला-मुलींना भविष्यात पुढे जाण्याची संधी उपलब्ध होईल, अशी माहिती शुक्रवारी एकता वर्ल्ड आणि हॅपी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतन देण्यात आली.

ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, अशा मुलांना देखील आम्ही यामध्ये सहभागी करणार आहोत. तसेच त्यांचे कला, कौशल्य या स्पर्धेमुळे लोकांसमोर येईल.

अमित मोदी, सेक्रेटरी, महाराष्ट्र पॅरा स्पोर्ट्स


एकूण ५०० स्पर्धकांना मिळणार संधी

या स्पर्धेत बॅडमिंटन, चेस, कॅरम, लॉन टेनिस, टेबल टेनिस, स्विमिंग आणि कराटे हे खेळ वैयक्तिक असणार आहे. तर बॉक्स क्रिकेट आणि रंक फुटबॉल हे संघिक खेळ असणार आहेत. एकूण ५०० स्पर्धकांना यात खेळण्यची संधी मिळणार आहे. आतापर्यंत १५० स्पर्धकांनी यामध्ये आपले नाव नोंदवले आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा