Advertisement

सींधू, सायना, के. श्रीकांत खेळणार जुन्याच संघातून


सींधू, सायना, के. श्रीकांत खेळणार जुन्याच संघातून
SHARES

व्होडाफोन प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या तिसऱ्या सीझन (पीबीएल) साठी भारताच्या पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल आणि श्रीकांत या टॉप खेळाडूंचा सोमवारी लिलाव झाला. हे तिन्ही खेळाडू जुन्याच टीमसोबत खेळणार आहेत. के. श्रीकांत आणि सायना अवध वॉरीयर्स मधून खेळणार आहेत, तर सिंधू देखील आपल्या जुन्या चेन्नई स्मॅशर्स या संघातून खेळणार आहे.



स्पर्धेत ८ संघाचा समावेश

ही स्पर्धा २२ डिसेंबर ते १४ जानेवारी २०१८ दरम्यान रंगणार आहे. या २४ दिवसांच्या स्पर्धेसाठी ११ देशातील १२० खेळाडूंचा लिलाव सोमवारी झाला. ही स्पर्धा मुंबई, हैदराबाद, लखनौ, चेन्नई, गुवाहटी अशा शहरात खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेत एकूण ८ संघाचा समावेश असेल. दिल्ली अँकर्स, मुंबई रॉकेट्स, बेंगळुरू ब्लास्टर, चेन्नई स्मॅशर्स, हैदराबाद हंटर्स, नॉर्थ इस्टर्न वॉरियर्स, अहमदाबाद स्मॅश मास्टर आणि अवध वॉरीयर्स अशी संघांची नावे आहेत. 

सोमवारच्या लिलावात एकूण १० ऑलिम्पिक खेळाडूंचा समावेश आहे. प्रत्येक खेळाडूंवर ७१ लाखापर्यंत खर्च करण्याची मुभा देण्यात आली आहे. यावेळी फ्रेंचायजीला आपल्या टीमवर २.१२ कोटी खर्च करण्याची मर्यांदा आहे. विजेत्या संघाला यावेळी ६ कोटी मिळणार आहेत. तिसऱ्या सीझनमध्ये दोन नव्या फ्रेंचायजीस असतील.


हेही वाचा - 

दिव्यांग आफरीनची सायनाशी भेट



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा