Advertisement

सर्जी बुबका यंदाच्या मुंबई मॅरेथाॅनचा ब्रँड अॅम्बेसेडर


सर्जी बुबका यंदाच्या मुंबई मॅरेथाॅनचा ब्रँड अॅम्बेसेडर
SHARES

मुंबईची शान म्हणून अोळखल्या जाणाऱ्या मुंबई मॅरेथाॅनचे या वर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे महान पोल व्हाॅल्टपटू सर्जी बुबका. सहा वेळा जागतिक विजेते ठरलेले, १९८८ चे अाॅलिम्पिक सुवर्णपदक विजेते अाणि माजी विश्वविक्रमवीर हे २१ जानेवारी २०१८ रोजी रंगणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथाॅनचे ब्रँड अॅम्बेसेडर असतील.


सर्जी बुबका यांची कारकीर्द

५४ वर्षीय पोल व्हाॅल्टपटू सर्जी बुबका हे अांतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या हाॅल अाॅफ फेममध्ये निवड करण्यात अालेल्या पहिल्या २४ अॅथलिट्सपैकी एक अाहेत. पोल व्हाॅल्टमध्ये ६.० मीटर अाणि ६.१० मीटरचा टप्पा पार करणारे बुबका हे पहिले अॅथलीट असून त्यांनी तब्बल ३५ वेळा पुरुषांच्या पोल व्हाॅल्टचा विश्वविक्रम मोडीत काढला अाहे. २००७ पासून ते अांतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी अाहेत. अांतरराष्ट्रीय अाॅलिम्पिक समितीचे ते मानद सदस्य अाहेत.


टाटा मुंबई मॅरेथाॅनचा एक भाग असल्याचा निखळ अानंद मला होत अाहे. मुंबई मॅरेथाॅन शर्यतीच्या अाणि मुंबईकरांच्या स्पिरिटबद्दल बरंच काही एेकून अाहे. तोच अनुभव घेण्यासाठी मी मुंबईत येण्याकरिता उत्सुक अाहे. सराव करताना दृढ निश्चय अाणि बांधीलकी ठेवली तर धावपटूंना शर्यतीच्या दिवशी सहजपणे अंतिम रेषा पार करता येईल. सर्व स्पर्धकांना मी शुभेच्छा देतो.

- सर्जी बुबका, विश्वविक्रमवीर पोल व्हाॅल्टपटू

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा