मराठमोळी श्रद्धा भारतीय रग्बी संघात

 Bhandup
मराठमोळी श्रद्धा भारतीय रग्बी संघात
मराठमोळी श्रद्धा भारतीय रग्बी संघात
See all
Bhandup, Mumbai  -  

भांडुप - भांडुप पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदार दिलीप लावंड यांची कन्या श्रद्धा हिची 18 वर्षाखालील आशियाई रग्बी चॅम्पियनशिसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. 2 डिसेंबरपासून ही स्पर्धा दुबईमध्ये खेळवली जाणार आहे.

मूळचे साताऱ्यातल्या खटावमधले लांवंड कुंटुंब सध्या मुलुंडमधील पोलीस वासाहतीत राहतात. लहनपणापासून खेळाची आवड असलेल्या श्रद्धा हीने शालेय स्तरावर चांगली कामगिरी करत स्थानिक, जिल्हा आणि राज्य स्तरावर अनेक पदकं मिळवली. 2009 पासून सातत्यानं यश मिळवलेल्या श्रद्धाला 21 आक्टोबर रोजी मुंबई जिमखाना येथे झालेल्या ज्यूनियर रग्बी चॅम्पियनशिपमध्ये खेळण्याची संधी मिळाली. या संधीचं सोन करत तिनं केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल तिची निवड भारतीय संघात करण्यात आलीय. पोलिसांच्या मुलीनं भरीव कामगिरी केल्यानं पोलीस दलाककडून दिलीप लावंड यांचं काैतूक केलं जात आहे.

Loading Comments