Advertisement

गोरेगावमध्ये रंगणार प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सव


गोरेगावमध्ये रंगणार प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सव
SHARES

वांद्रे ते दहिसर या पट्ट्यातील शाळांसाठी क्रीडा महोत्सवाची पर्वणी म्हणजे प्रबोधन अांतरशालेय क्रीडा महोत्सव. ५ ते ८ डिसेंबर या कालावधीत गोरेगाव येथील प्रबोधनच्या क्रीडांगणात रंगणाऱ्या या महोत्सवात जवळपास २३० शाळांमधील २५०० पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होणार अाहेत. सुभाष देसाई यांनी सुरू केलेल्या या प्रबोधन क्रीडा महोत्सवाच्या ४०व्या पर्वाचे उद्घाटन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी ८.३० वाजता होणार अाहे.


कोणत्या खेळांचा समावेश?

प्रबोधन अांतरशालेय क्रीडा महोत्सवात अॅथलेटिक्स, तिरंदाजी, जलतरण, टेनिस, कराटे या खेळांसह कबड्डी, खो-खो, मल्लखांब या अस्सल देशी खेळांच्या जोडीला बुद्धिबळाच्या स्पर्धाही अायोजित केल्या जातात. प्रबोधनच्या अद्ययावत अशा अोझोन तलावात अाणि जाॅगर्स पार्कवर या स्पर्धा घेतल्या जातात.


या शाळांनी पाडली छाप?

मुंबई उपनगरातील महात्मा गांधी विद्यामंदिर, गोकूळधाम, यशोधाम, चिल्ड्रन्स अकादमी, रुस्तमजी या शाळांनी अातापर्यंत अापली छाप पाडली अाहे. अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध असल्याने उपनगरातील बऱ्याचशा शाळा या स्पर्धेत सहभागी होत अाहेत.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा