Advertisement

राज्य गुणांकन कॅरम स्पर्धेत प्रशांत मोरे, विकास धारिया यांची अागेकूच


राज्य गुणांकन कॅरम स्पर्धेत प्रशांत मोरे, विकास धारिया यांची अागेकूच
SHARES

शिवाजी पार्क जिमखान्याने अायोजित केलेल्या १०व्या महाराष्ट्र राज्य गुणांकन कॅरम स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत मुंबईच्या प्रशांत मोरे अाणि विकास धारिया यांनी अापापले सामने सहज जिंकत अागेकूच केली. जागतिक विजेत्या प्रशांत मोरेने दोन गेमपर्यंत रंगलेल्या लढतीत ठाण्याच्या महेश शेट्येचा २५-१८, २५-९ असा धुव्वा उडवला. नुकत्याच झालेल्या मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशनच्या राज्य मानांकन स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या विकास धारिया याने मुंबई उपनगरच्या सुबोध शहाला २५-१२, २५-६ असे पराभूत करत अापली विजयी घोडदौड कायम राखली.


पालघरच्या दत्तात्रय कदमची सुरेख कामगिरी

मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशन अाणि महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या विद्यमाने शिवाजी पार्क जिमखाना येथे अत्यंत नीटनेटक्या पद्धतीने या स्पर्धेचं अायोजन करण्यात अालं अाहे. पालघरच्या दत्तात्रय कदमने मुंबईच्या किशोर वागळेचे अाव्हान दोम गेममध्ये २५-१६, २५-१६ असे परतवून लावत चौथ्या फेरीत प्रवेश केला. अन्य एका लढतीत, माजी अांतरराष्ट्रीय कॅरमपटू सुहास पोमेंडकरला मुंबईच्या नरेन मारुचा याने चांगलेच झुंजवले. अखेर पोमेंडकरने तीन गेमपर्यंत चाललेल्या या लढतीत, नरेनचा २५-६, १४-२५, २५-१६ असा पराभव करून चौथी फेरी गाठली. या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे थेट प्रक्षेपण mumbailive.com या संकेतस्थळावर पाहता येईल. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा