Advertisement

मुंबईतील युवा खेळाडूंना मिळणार गोपीचंदकडून प्रशिक्षणाचे धडे


मुंबईतील युवा खेळाडूंना मिळणार गोपीचंदकडून प्रशिक्षणाचे धडे
SHARES

सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, किदम्बी श्रीकांत यांच्यासारखे पदकविजेते खेळाडू घडविणारे महान प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्याकडून बॅडमिंटनचे धडे गिरवण्याची संधी मुंबईतील युवा बॅडमिंटनपटूंना मिळणार अाहे. 'यंग चॅम्प्स' उपक्रमांतर्गत 10 वर्षांखालील मुला-मुलींना अापल्या बॅडमिंटन कौशल्याचा 2 मिनिटांचा व्हिडियो 'क्वेस्ट फाॅर एक्सलन्स'च्या फेसबुक अाणि ट्विटरवर अपलोड करायचा अाहे. त्यानंतर निवड झालेल्या युवा खेळाडूंना हैदराबादमधील पुलेला गोपीचंद अकादमीमध्ये राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्याकडून प्रशिक्षण घेण्याची संधी मिळेल.


काय करावं लागेल?

10 वर्षांखालील मुला-मुलींच्या पालकांनी अापल्या पाल्याचा बॅडमिंटन खेळतानाचा 2 मिनिटांचा व्हिडियो 'क्वेस्ट फाॅर एक्सलन्स'च्या फेसबुक अाणि ट्विटरवर 28 डिसेंबरअाधी अपलोड करायचा अाहे. स्वत: गोपीचंद या निवड चाचणी स्पर्धेतील खेळाडूंची निवड करतील. त्यानंतर चार अाठवड्यांनी विजेत्यांची घोषणा करण्यात येईल.


निवड कोणत्या निकषांवर अाधारित केली जाईल?

खेळाडूंचे बेसिक फुटवर्क अाणि शैली तसेच त्यांचं बॅडमिंटनमधील कौशल्य पाहिलं जाईल. शाॅट मारताना त्यांच्या हाताचा अाणि डोळ्याचा समन्वय कसा असतो, हेसुद्धा पाहण्यात येईल. त्यांनी मारलेला शाॅट किती वेगाने प्रतिस्पर्ध्यापर्यंत पोहोचतो, या निकषांच्या अाधारावर 10-15 मुला-मुलींची निवड केली जाईल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा