रेडिओ कॉमेंट्री नो मोअर...

मुंबई - पूर्वीच्या काळी मॅच म्हटली की लोकांचे कान रेडिओला लागायचे. आजही लोकं प्रवास करताना एफएमवर मॅच ऐकताना आपण पाहतो. मात्र 8 डिसेंबरला वानखेडे स्टेडियमवर होणारा भारत विरुद्ध इंग्लंडचा कसोटी सामना ऐकण्याची संधी श्रोत्यांना मिळणार नाही. त्याचं कारण आहे BCCI आणि आकाशवाणी यामधील वाद.

क्रिकेट वेड्यांना मॅचची कॉमेंट्री ऐकायला मिळणार नाही यामुळे क्रिकेटवेडे नक्की नाराज होतील. मात्र या मागचं कारणं तरी काय? हा वाद क्रिकेटचा आहे की मैदाना  बाहेरचा? कारणं काहीही असो या सगळ्यामध्ये नुकसान होणारेय ते  श्रोत्यांचे अर्थातच क्रिकेट प्रेमींचे. 

एकीकडे देशाचे पंतप्रधान मन की बात रेडिओद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवताना दिसतायेत. तर दुसरीकडे क्रिकेटप्रेमींना रेडिओ कामेंट्रीला मुकावं लागतंय. 

Loading Comments