Advertisement

रोअरिंग पँथर्सची एमसीएफ टेबल टेनिस लीगच्या अंतिम फेरीत धडक


रोअरिंग पँथर्सची एमसीएफ टेबल टेनिस लीगच्या अंतिम फेरीत धडक
SHARES

रोअरिंग पँथर्सने मंडपेश्वर सिविक फेडरशेनच्या स्पोर्टस काॅम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या एमसीएफ प्रीमिअर टेबल टेनिस लीगमध्ये तीन विजय अाणि एका पराभवासह अव्वल स्थानी झेप घेऊन अंतिम फेरीत धडक मारली अाहे. अकिरा ड्रॅगन संघानेही तीन विजय अाणि एका पराभवासह अागेकूच केली, पण त्यांना सरस गुणांच्या अाधारे दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेच्या नियमांनुसार, पाच संघांच्या या लीगमधील अव्वल संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल तर दुसऱ्या अाणि तिसऱ्या क्रमांकावरील संघांना अंतिम फेरीसाठी एकमेकांशी झुंजावे लागेल.


अक्षय गोगारी अपराजित

रोअरिंग पँथर्सचा कर्णधार अक्षय गोगारी याला अद्याप एकाही पराभवाचा सामना करावा लागला नाही. डीएस वाॅरियर्सविरुद्ध पँथर्सने एकमेव पराभव पत्करला तरी अक्षयची विजयी घोडदौड कुणीही रोखू शकलं नाही. या सामन्यात पँथर्सला ३-४ असे पराभूत व्हावे लागले. त्यानंतर प्रेमजी संघावर ४-३ असा विजय मिळवून रोअरिंग पँथर्सने गटात अव्वल स्थानासह थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.


अकिरा ड्रॅगन दुसऱ्या स्थानी

अखेरच्या साखळी सामन्यात अोमटेक्सने २-० अशी अाघाडी घेतली होती. पण कर्णधार अमेय भानुशाली अाणि सिद्धी कोळेकर यांनी कडवी लढत देत अापापले सामने जिंकून अकिरा ड्रॅगन संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर स्वयम इब्रामपूरकरने सोहन निरकेचा पाडाव करून अकिरा ड्रॅगनला विजय मिळवून दिला. अकिरा ड्रॅगनने दुसरे तर डीएस वाॅरियर्सने तिसरे स्थान पटकावले. अाता या दोन संघांमध्येच अंतिम फेरीच्या दुसऱ्या जागेसाठी लढत होईल.


हेही वाचा -

टाटा मुंबई मॅरेथाॅनच्या नोंदणीला सुरुवात

सर्फराझ खानला करायचीय मुंबई संघात घरवापसी

'अन् विराट कोहलीनं मला ब्लॅकबेरी फोन गिफ्ट दिला'



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा