निरोगी ह्रदयासाठी धावली 12,000 मुले

Mahalaxmi
निरोगी ह्रदयासाठी धावली 12,000 मुले
निरोगी ह्रदयासाठी धावली 12,000 मुले
निरोगी ह्रदयासाठी धावली 12,000 मुले
निरोगी ह्रदयासाठी धावली 12,000 मुले
See all
मुंबई  -  

महालक्ष्मी - येथील रेसकोर्समध्ये ‘लिटल हार्ट्स' मॅरेथॉन रविवारी आयोजित करण्यात आली होती. बाई जेरबाई वाडिया बाल रुग्णालयातर्फे सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या सहकार्याने याचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनमध्ये मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील 100 हून अधिक शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. मुलांमध्ये उद्भवणाऱ्या ह्रदयरोगांविषयी जागृती निर्माण करणे हे या मॅरेथॉनचे उद्दिष्ट होते. या वेळी अॅक्सिस बँकेच्या उपाध्यक्षा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि वाडिया समुहाचे व्यवस्थापकीय संचालक नेस वाडिया उपस्थित होते. या वेळी चित्रपट दिग्दर्शक, लेखक आणि निर्माते मधुर भंडारकर, अभिनेत्री कीर्ती कुल्हारी, मिस अर्थ प्रियांका खुराना गोयल यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आले.

फिजिकल अॅक्टीव्हीटीबाबत मुले आणि पालकांमध्ये जनजागृती खूप महत्वाची आहे. धावणे, चालणे सदृढ आरोग्यासाठी गरजेचे आहे. आजची तरूण पिढी ही लॅपटॉप, मोबाईल तसेच व्हिडिओ गेम्समध्ये मग्न असतात. त्या पार्श्वभूमीवर लिटील हार्ट मॅरेथॉनसारख्या माध्यमातून 12 हजार हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग नक्कीच या बदलत्या जीवनशैलीबाबत जनजागृृतीस मदत करेल.

-अमृता फडणवीस

‘सेव्ह हार्ट्स सेव्ह लाईफ’ ही मोहीम सुरू करून मुलांमधील वाढत्या ह्रदयरोगाविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आमच्या पेडियाट्रीक ह्रदयरोग विभागामार्फत दरवर्षी 500 हून अधिक लहान मुलांवर शस्त्रक्रियेची सोय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमात मुलांनी मुलांसाठी घेतलेला सहभाग अतिशय उत्साहवर्धक आहे.
-नेस वाडीया

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.