'रन फॉर लिटरेसी'

 Dalmia Estate
'रन फॉर लिटरेसी'
'रन फॉर लिटरेसी'
'रन फॉर लिटरेसी'
'रन फॉर लिटरेसी'
'रन फॉर लिटरेसी'
See all

मुलुंड - 'रन फॉर लिटरेसी' या संकल्पनेच्या आधारावर 'रोटरी मुलुंड हिल व्ह्यू' या संस्थेने 18 डिसेंबर रोजी मॅरेथॉनचं आयोजन केलंय. या मॅरेथॉनमध्ये नोंदणी करण्यासाठी संकेतस्थळ उपलब्ध करून दिलेय. ही मॅरेथॉन मुलुंड बालराजेश्वर मंदिर ते घाटकोपर अशी आखण्यात आली आहे. रोटरी मुलुंड हिल व्ह्यू ही संस्था अनेक प्रकारे समाजकार्यात आपलं योगदान देते. या मॅरेथॉनमधून मिळणारं आर्थिक उत्पन्न साक्षरतेसाठी वापरण्यात येणार आहे.

यामध्ये विजेत्याला एक लाख 51 हजार रोख रक्कम दिॆली जाईल. या मॅरेथॉनमध्ये नोंदणी करण्यासाठी www.mumlundrun.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिली आहे. तसेच विक्रोळी येथे संस्थेच्या सभासदांमार्फत फॉर्मचं वाटप देखील सुरू आहे. या संस्थेचे अध्यक्ष दीपक लिलानी आणि राम प्रताप गुगलीया, सेक्रेटरी स्नेहा मल्होत्रा यांनी या मॅरेथॉमध्ये जास्तीत जास्त जणांनी सहभाग घ्यावा असं आवाहन केलं आहे.

Loading Comments