Advertisement

मास्टर ब्लास्टर म्हणून साजरा करणार नाही ४७ वा वाढदिवस

... म्हणून यंदा सचिन तेंडुलकर त्याचा वाढदिवस साजरा करणार नाही असं समोर येत आहे.

मास्टर ब्लास्टर म्हणून साजरा करणार नाही ४७ वा वाढदिवस
SHARES

टीम इंडियाचा माजी कप्तान आणि मास्टरब्लास्टर सचिन २४ एप्रिल रोजी ४७ वर्षाचा होत आहे. मात्र यंदा तो त्याचा वाढदिवस साजरा करणार नाही असं समोर येत आहे. देशात आणि जगात पसरलेलं कोरोना संकट, पाहता सचिननं ही वेळ सेलिब्रेशन करण्याची नसल्याचं सांगून वाढदिवस साजरा करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

सचिनचा वाढदिवस दरवर्षी तो जिथं असेल तिथं मोठ्या धामधुमीनं साजरा केला जातो. मात्र यंदाची परिस्थिती वेगळी आहे. ही आनंद साजरा करण्याची वेळ नाही त्यामुळे यंदा घरी असूनही वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय सचिननं घेतला आहे. जग आत्ता गंभीर संकटातून जात आहे अश्यावेळी वाढदिवस साजरा करण्याचा प्रश्नच येत नाही, असं सचिनचं म्हणणं आहे. त्याचा हा निर्णय कोरोना वॉरीअर्स ना पर्सनल सन्मान देण्याचा एक प्रयत्न आहे असं त्याचं म्हणणं आहे.

सचिननं कोरोना लढयासाठी पीएम केअर्स फंडाला ५० लाख रुपये दिले आहेत. अर्थात सचिनच्या चाहत्यांनी त्याचा वाढदिवस साजरा करण्याचा वेगळा मार्ग शोधला आहे. त्याच्या फॅन क्लबपैकी एक सचिनचे ४० दुर्मिळ फोटो सोशल मिडियावर शेअर करणार आहे. तर आणखी एक फॅन क्लब सचिनच्या सामाजिक कार्याचा परिचय सोशल मीडियावर करून देणार आहे.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा