Advertisement

सचिन तेंडुलकरने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहलं पत्र


सचिन तेंडुलकरने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहलं पत्र
SHARES

भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू आणि क्रिकेट जगतात देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. या पत्रातून त्याने नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे की, 'भारतातील आंतर्राष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंना केंद्र सरकारच्या आरोग्य योजने (सीजीएचएस) चा लाभ मिळावा'

या पत्रात त्याने हॉकीच्या ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता मोहम्मद शाहिदचे उदाहरण दिले. शाहीद याचे अवयव निकामी झाल्याने जुलै २०१७ मध्ये त्याचा मृत्यू झाला होता. त्याची परिस्थिती हलाखिची असल्याने त्याला वेळेवर उपचार घेता आले नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

सचिन तेंडुलकरने २४ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहलं होतं. ज्यामध्ये त्याने विनंती केली आहे की, आंतर्राष्ट्रीय स्तरावर पदक जिंकणाऱ्या सर्व खेळाडूंना केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेत (सीजीएचएस) सामील करून घ्यावे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा