Advertisement

'साई'च्या बॅडमिंटनपटूंची उपांत्य फेरीकडे वाटचाल


'साई'च्या बॅडमिंटनपटूंची उपांत्य फेरीकडे वाटचाल
SHARES

जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) बॅडमिंटनपटूंनी सुरेख कामगिरी करत सेंसिअो स्मॅशर्स साघाचा ३-२ असा पराभव करत अाठ संघांचा समावेश असलेल्या एमसीएफ-बॅडमिंटन प्रीमिअर लीगच्या उपांत्य फेरीत जवळपास धडक मारली अाहे.


मंडपेश्वर सिविक फेडरेशनच्या कोर्टवर झालेल्या या सामन्यात साईच्या हितेश संपतला पहिल्याच सामन्यात कथन शाहकडून पराभव पत्करावा लागला. मात्र त्यांच्या विकास शेट्टी अाणि रुपेश कात्रोडी या दुहेरीच्या जोडीने अाणि ललिता कतरे अाणि सौरभ साळगांवकर या मिश्र दुहेरी जोडीने विजय मिळवत साईचे अाव्हान जीवंत ठेवले. ज्येष्ठांच्या गटात संजय शाह अाणि यश भट यांनी अारामात विजयश्री मिळवत साईला ३-१ अशी विजयी अाघाडी मिळवून दिली. अन्य सामन्यांत, बॅडमिंटन स्निपर्सनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत मावरिक स्क्वाड संघावर ४-१ अशी मात केली.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा