Advertisement

चेस टुर्नामेंटमध्ये जोशी, पाटील यांची आगेकूच


चेस टुर्नामेंटमध्ये जोशी, पाटील यांची आगेकूच
SHARES

एसबीआय लाइफ फिडे रेटिंग चेस टुर्नामेंटच्या सहाव्या फेरीत दुसरा मानांकित सजनदास जोशी आणि सातवा मानांकित केतन पाटील यांनी चतुर बुद्धीच्या खेळावर आगेकूच केली. 

ही स्पर्धा पेडर रोड जवळील रशियन कल्चर सेंटर येथे खेळवण्यात आली. इंडियन चेस स्कूलतर्फे आयोजित या स्पर्धेत फिडे मास्टर जोशी आणि गोपाळ राठोड यांच्यात अत्यंत रोमांचक खेळ झाला. यावेळी राठोडने उत्कृष्ट अशा 54 चाली केल्या. पण अनुभवी जोशीसमोर त्याला विजयावर मोहर उमटवता आली नाही. राठोडच्या 26 व्या चालीदरम्यान झालेल्या चुकीमुळे जोशीला जिंकण्याची संधी मिळाली.

दुसऱ्या बोर्डवर झालेल्या लढतीत तरुण खेळाडू मलय कृष्णासोबत झालेल्या लढतीत केतनने सहजपणे विजय साकारला. शेवटच्या वेळेत मलयच्या संथ खेळीने केतनला विजयाची संधी मिळाली.

अव्वल मानांकित अतुल दहालेने 22व्या चालीवर 10 वर्षांच्या ऋतिक कृष्णनचा पराभव केला. याचदरम्यान झालेल्या तिसऱ्या मानांकित अमरदीप बारटक्केने प्रतिस्पर्धी 12 वर्षीय देविका राऊळचा 5-4 ने पराभव केला.



हेही वाचा

अनुभवी बारटक्केला 'चेस टुर्नामेंट'मध्ये कडवे आव्हान


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा