• हॉकी स्पर्धेत रेल्वेचा संघ अजिंक्य
SHARE

चर्चगेट - बॉम्बे गोल्ड कप हॉकी स्पर्धेत साउथ सेंट्रल रेल्वे, सिकंदराबाद या संघानं विजेतेपद पटकवालं. बुधवारी संध्याकाळी झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात या संघानं पंजाब नॅशनल बँकेच्या संघावर चुरशीच्या सामन्यात 4-3 असा विजय मिळवला.

चर्चगेट येथील महिंद्रा स्टेडियमध्ये हा सामना रंगला. पंजाब नॅशनल बॅंकेच्या भगससिंगनं पाचव्या मिनिटालाच गोल करून संघाला आघाडीवर नेलं. साउथ सेंट्रल रेल्वे संघाच्या संजीपने 12व्या मिनिटला गोल करून सामना बरोबरीत आणला. पण पंजाब नॅशनल बँकेच्या गगनदीपनं गोल करत संघाला 2-1 आघाडी मिळवून दिली. एम. जी. पोंचानं 39व्या मिनिटाला लढत पुन्हा 2-2 अशी बरोबरीत आणली. साउथ सेंट्रल रेल्वे संघाच्या संजीपनं गोल करून संघाला पुन्हा 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. तर राजू पालने 53 व्या मिनिटाला पंजाब नॅशनल संघाचा बचाव भेदत ही आघाडी 4-2 अशी केली. पंजाब नॅशनल बॅंकेच्या गगनदीपनं 55 व्या मिनिटाला गोल करून ही आघाडी 4-3 अशी भरून काढली खरी, पण त्यानंतर गोल करता न आल्यामुळे पंजाब नॅशनल संघाला अखेर पराभव स्वीकारावा लागला. स्पर्धेत बेस्ट गोलकिपर साउथ सेंट्रल रेल्वेचा सुशांत तिरकी ठरला, याच संघाच्या पी. आर. अय्यपाला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या