• शिवाजी पार्कवर रंगली फ्रेंडली मॅरेथॉन
  • शिवाजी पार्कवर रंगली फ्रेंडली मॅरेथॉन
SHARE

फ्रेंडली मॅरेथॉनचं आयोजन रविवारी शिवाजी पार्क ते वरळी सी लिंकदरम्यान करण्यात आलं होतं. या मॅरेथॉनमध्ये एकूण 400 ते 500 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. मुंबई, नवी मुंबई तसेच ठाणे इथल्या स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. 10 किलोमीटरच्या या मॅरेथॉनमध्ये अबालवृद्धांनी धावण्याचा आनंद लुटला. गेल्या 2 वर्षापासून या मॅरेथॉनचं आयोजन 'सेव्हन ग्रुप्स फ्रेंड' यांच्यातर्फे करण्यात येत आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले स्पर्धक देखील यात सहभागी झाले होते.

या मॅरेथॉनचे वैशिष्ट्य म्हणजे यात सर्वजण एकत्र येऊन धावण्याबद्दलचे आपले अनुभव एकमेकांसोबत व्यक्त करतात. तसेच धावणे हे आरोग्यास किती लाभदायक आहे, याचं मार्गदर्शन देखील यावेळी करण्यात आलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या