SHARE

लखारिया क्रिकेट लीगचा दुसऱ्या दिवसाच्या सामन्यात शिवाजी पार्क जिमखाना संघाने माहिम जुवेनाइल संघाला 13 धावांनी पराभूत केले. हा अटीतटीचा सामना शिवाजी पार्कमध्ये रंगला होता. यामध्ये शिवाजी पार्क जिमिखानाने 30 षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यात 169 धावा केल्या.

शिवाजी पार्क जिमखाना संघाला जिंकून देण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगीरी करणारा राज देशमुख हा सामनावीर ठरला. माहिम जुवेनाइलने चांगली लढत देताना 27 धावांत 156 धावा केल्या.

ही स्पर्धा राऊंंड रॉबिन या पद्धतीत होत आहे. हे सामने गोरेगाव स्पोर्टस् क्लब, एमआयजी, शिवाजी पार्क, कांदिवलीतले पय्याडे ग्राऊंड, आरे भास्कर ग्राऊंड आणि माटुंग्यातील डीपीसीतल्या महिनाभर सुरू राहणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या