Advertisement

सीसीआय बिलियर्डस स्पर्धेत सिद्धार्थ पारीखला जेतेपद


सीसीआय बिलियर्डस स्पर्धेत सिद्धार्थ पारीखला जेतेपद
SHARES

रेल्वेच्या सिद्धार्थ पारीखने शानदार कामगिरीचे प्रदर्शन करत क्रिकेट क्लब अाॅफ इंडिया अायोजित सीसीअाय बिलियर्डस लीग स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्याने अंतिम फेरीत अोएनजीसीच्या सौरव कोठारीचा ८१८-३५९ असा धुव्वा उडवत चमक दाखवली. सीसीअायच्या सर विल्सन जोन्स बिलियर्डस रूममध्ये रंगलेल्या अंतिम सामन्यात मुंबईस्थित सिद्धार्थने संयमी खेळ करत आपली कामगिरी उंचावली. त्याने सुरुवातीला २०३ गुणांचा ब्रेक नोंदवला व नंतर ५३ गुणांच्या ब्रेकची नोंद केली. सामन्याच्या शेवटपर्यंत त्याने आपले वर्चस्व कायम ठेवले. कोलकाताच्या सौरव कोठारीने या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली. पण त्याला ७५, ८६, १०० गुणांचे ब्रेक लगावता अाले.


४५६ गुणांचा ब्रेक

विशेष म्हणजे, सिद्धार्थ पारीखने अंतिम सामन्यात ४५६ गुणांचा ब्रेक लगावून सर्वांनाच अाश्चर्याचा धक्का दिला. २०१५ साली त्याने कॅनडा येथे झालेल्या अमेरिका कप स्पर्धेमध्ये ५१८ गुणांचा ब्रेक नोंदवला होता. त्याचबरोबर बंगळुरू येथही त्याने ४७८ गुणांचा ब्रेक नोंदवला होता. कोठारीने या स्पर्धेत २११, २४७ अाणि २६१ असे तीन द्विशतकी ब्रेक लगावले होते, पण अंतिम सामन्यात सिद्धार्थसमोर त्याचा निभाव लागला नाही.


मिळाले इतके बक्षीस

विजेत्या सिद्धार्थ पारीखला सीसीआय बिलियर्डस चषकासह १.२५ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात अाले तर उपविजेता कोठारी ७५ हजार रुपयांचा मानकरी ठरला. सर्वोत्तम ब्रेक अाणि तीन द्विशतकी ब्रेक लगावल्याबद्दल पारीख अाणि कोठारी यांना अाणखीन १० हजार रुपयांचा लाभ झाला. उपांत्य फेरीतील पराभूत खेळाडू अालोक कुमार व अशोक शांडिल्य यांना प्रत्येकी ४० हजार रुपये देण्यात अाले.


हेही वाचा -

अजित अागरकरची निवड समितीतून हकालपट्टी?

मुंबईची निवड समिती खेळाडूंच्या करिअरशी खेळतेय – दिलीप वेंगसरकर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा