सिंघानिया शाळेने मारली बाजी

  Thane
  सिंघानिया शाळेने मारली बाजी
  मुंबई  -  

  घोडबंदर - सुलोचनादेवी सिंघानिया शाळेने बिलाबाँग शाळेला 117 धावांनी मात देत १३ वर्षांखालील दुसऱ्या श्री मा करंडकावर आपलं नाव कोरलं आहे. यामध्ये सिंघानिया शाळेच्या विद्यार्थांनी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तर सिंघानिया शाळेच्या जय धात्रक आणि शिवमने चांगली भागीदारी करत 176 धावांचा डोंगर रचला. मात्र बिलाबाँग शाळेने सुरुवातीलाच आपले गडी गमावल्याने त्यांना अवघ्या 59 धावाच करता आल्या. यामध्ये सिंघानिया शाळेच्या आर्यन याने 4 विकेट घेतल्या, तर हृत्विकने तीन विकेट घेतल्या.

  मुंबईचा माजी रणजी क्रिकेटपटू आणि आता 16 वर्ष वयोगटातल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये निवड झालेल्या राजेश सुतार याच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. घोडबंदर रो़ड येथील पाटलीपाडातल्या श्रीमा स्टेडियमध्ये झालेल्या या स्पर्धेत 16 संघांनी सहभाग घेतला होता.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.