चेंबुरमध्ये अनोख्या पद्धतीने साजरी होणार महापुरुषांची जयंती

Chembur
चेंबुरमध्ये अनोख्या पद्धतीने साजरी होणार महापुरुषांची जयंती
चेंबुरमध्ये अनोख्या पद्धतीने साजरी होणार महापुरुषांची जयंती
चेंबुरमध्ये अनोख्या पद्धतीने साजरी होणार महापुरुषांची जयंती
चेंबुरमध्ये अनोख्या पद्धतीने साजरी होणार महापुरुषांची जयंती
चेंबुरमध्ये अनोख्या पद्धतीने साजरी होणार महापुरुषांची जयंती
See all
मुंबई  -  

चेंबूर - चेंबूरच्या संत एकनाथ मुलांच्या शासकीय वसतीगृहातील विद्यार्थी परिवर्तन समितीच्या वतीने आणि सोशल पार्टनर युवा आधार फाउंडेशन यांच्या सहयोगाने सर्व महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी करण्यात येणार आहे. ही संयुक्त जयंती वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाणार आहे. हल्ली तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे मुलांना मैदानी खेळ खेळणे शक्य होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी संयुक्त जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी वेगवेगळ्या खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.

27 मार्च पासून 5 एप्रिल पर्यंत वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये कॅरम, चेस, व्हॉलीबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन या वेगवेगळ्या पाच खेळांचा समावेश आहे. या स्पर्धांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धा सायंकाळच्या वेळेत आयोजित केल्या जातात. त्यामुळे महाविद्यालयात शिकत असलेल्या मुलांच्या वेळांच्या नियोजनानुसार या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच बरोबर 13 आणि 14 तारखेला संयुक्त जयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना विद्यार्थी परिवर्तन समिती आणि सोशल पार्टनर युवा आधार फाऊंडेशन यांच्या वतीने 14 एप्रिलला सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी उत्कृष्ट खेळणाऱ्या काही खेळाडूंना पारितोषिकही देण्यात येणार आहे. मुंबई शहरात वसतीगृहात रहणाऱ्या विद्यार्थ्यांना बाहेर जाऊन मैदानी खेळ खेळणे शक्य नसते. त्यामुळे विद्यार्थी परिवर्तन समिती आणि युवा आधार फाऊंडेशन यांच्या संकल्पनेतून या स्पर्धा भरविण्यात आल्या आहेत. या सांस्कृतिक कार्यक्रम आणि खेळांच्या स्पर्धांची सांगता 14 एप्रिलला करण्यात येणार आहे.

सध्या तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे आणि शिक्षण पद्धतीत आलेल्या वेगामुळे कुठेतरी मैदानी खेळांकडे मुले दुर्लक्ष करताना दिसतात. विद्यार्थी परिवर्तन समिती आणि युवा आधार फाउंडेशन यांची ही उत्तम संकल्पना आहे. या स्पर्धांमुळे मुले उत्साहाने यामध्ये सहभागी होतात. आम्ही कॉलेजला जात असल्यामुळे प्रत्येक जयंतीसाठी वेळ काढून ती साजरी करणे जमत नाही. त्यामुळे संयुक्त जयंती आणि त्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा ही संकल्पना आम्हा विद्या्र्थ्यांना आवडल्याची प्रतिक्रिया भगवान कांबळे या विद्यार्थ्याने दिली.

तसेच 'शासकीय वसतीगृहात राहणारी उच्च शिक्षणासाठी ग्रामीण भागातून आलेली ही मुले आहेत. त्यांना रोजच्या अभ्यासातून एक विरंगुळा मिळावा यासाठी या स्पर्धांचे आम्ही आयोजन केले आहे. जयंतीला डीजे लाऊन ध्वनी प्रदूषण न करता खेळाच्या माध्यमातून त्यांना त्यांच्यातील असलेले गुण दाखवण्यासाठी ही स्पर्धा असल्याची प्रतिक्रिया युवा आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष गोरख उबाळे यांनी दिली.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.