घाटकोपरमध्ये स्पोर्ट्स समर कॅम्पचे आयोजन

 Ghatkopar
घाटकोपरमध्ये स्पोर्ट्स समर कॅम्पचे आयोजन
Ghatkopar, Mumbai  -  

घाटकोपर - विद्यानिकेतन महाविद्यालयाच्या वतीने ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थांसाठी स्पोर्ट्स समर कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. विद्यानिकेतन महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक कमलदास वाघ यांच्या संकल्पनेतून स्पोर्ट्स समर कॅम्पचे आयोजन केले आहे. घाटकोपर पूर्व येथील विद्यानिकेतन महाविद्यालयात शनिवारपासून या समर कॅम्पला सुरुवात झाली आहे. 25 एप्रिलपर्यत हा समर कॅम्प सुरू असणार आहे. हा स्पोर्ट्स समर कॅम्प सकाळी 7 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यत असणार आहे. कॅम्पमध्ये कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, सेल्फ डिफेंस ट्रेनिंग, टेनिस बॉल क्रिकेट, अॅथलेटिक्स शिकविण्यात येणार आहे. प्रत्येक खेळाचे प्रशिक्षण देण्यासाठी कुशल क्रीडा मार्गदर्शक येणार आहेत.

Loading Comments