Advertisement

शिवाजी शिक्षण संस्थेची धावणी, लंगडी स्पर्धा


शिवाजी शिक्षण संस्थेची धावणी, लंगडी स्पर्धा
SHARES

घाटकोपर – पंतनगरमधल्या शिवाजी शिक्षण संस्था, मल्टी-पर्पज हायस्कुल इथं शनिवारी धावणी आणि लंगडीची स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये पाचवी ते सातवीच्या धावणी स्पर्धेत सहावी ‘ब’ वर्गातली प्रिया गायकवाडनं प्रथम क्रमांक मिळवलाय. तर मुलांच्या गटात धावणीच्या स्पर्धेत दिपक गुजर प्रथम आला. लंगडी स्पर्धेत पाचवी ‘अ’ मधील सुप्रिया कांबळेनं प्रथम क्रमांक पटकवला.

या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवीच्या ‘अ' आणि ‘ब’ वर्गातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. शनिवारी 10 डिसेंबरला दुपारी 4 वाजता या स्पर्धा घेण्यात आल्या.

संबंधित विषय
Advertisement