'महानामा'च्या उपस्थितीने 'रोशन' झाला एमआयजीचा पुरस्कार वितरण सोहळा

Bandra East

See all
मुंबई  -  

माहिम-दादर चॅलेंज शिल्ड, यंग कॉम्रेड शिल्ड आणि पद्माकर तालीम शिल्ड या टुर्नामेंटमधील सन 2015-2016-2017 असा 2 वर्षांचा बक्षिस वितरण सोहळा बुधवारी वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये रंगला. यावेळी श्रीलंकेचा माजी क्रिकेटर रोशन महानामा आणि एमआयजी जनरल सेक्रेटरी निकुंज व्यास तसेच इतर पदाधिकारीदेखील उपस्थित होते.

गेल्या दोन वर्षांत ज्या टूर्नामेंट खेळवण्यात आल्या होत्या त्यांचे बक्षीस वितरण बुधवारी संपन्न झाले. एमआयजी क्लब सतत आपल्या खेळांडूसाठी नवनवीन उपक्रम राबवत असते. या क्लबमधून आतापर्यंत अनेक खेळाडू घडले आहेत. यावेळी यंग कॉम्रेड शिल्ड क्रिकेट टुर्नामेंट 2015 ते 16 मध्ये क्रिकेट क्लब ऑफ इंडिया विजेते तर प. कर्नाटक एस ए संघ उपविजेते ठरले. तसेच उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज म्हणून अनुक्रमे क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचा सुजीत नाईक आणि अनिकेत रेडकर यांचा सत्कार करण्यात आला. 2016-17 मध्ये विजेता म्हणून डॉ. डी वाय पाटील स्पोर्ट्स अकादमी तर उपविजेता फोर्ट विजय क्रिकेट क्लबला गौरविण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज म्हणून शोएब शेख आणि गोलंदाज म्हणून शिवम दुबे यांना यावेळी पुरस्काराने गौरवण्यात आले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.