Advertisement

चिल्ड्रन्स अकादमी, सेंट इलियस संघाला हाॅकी स्पर्धेचे विजेतेपद


चिल्ड्रन्स अकादमी, सेंट इलियस संघाला हाॅकी स्पर्धेचे विजेतेपद
SHARES

अाज २९ अाॅगस्ट म्हणजे हाॅकीचे जादूगर ध्यानचंद यांचा जन्मदिवस. हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून गौरविण्यात येतो. त्यानिमित्ताने चर्चगेट येथील महिंद्रा स्टेडियमवर अायोजित करण्यात अालेल्या दिवंगत मेजर ध्यानचंद अांतरशालेय हाॅकी स्पर्धेत खारच्या सेंट इलियस हायस्कूल संघाने तसेच मालाडच्या चिल्ड्रन्स अकादमी स्कूलने अनुक्रमे मुली अाणि मुलांच्या गटात विजेतेपद पटकावले. मुलांच्या गटात चिल्ड्रन्स अकादमीने गुरुनानक हायस्कूलचा १-० असा पाडाव करत विजेतेपदाला गवसणी घातली.


वंश शाहचा निर्णायक गोल

चिल्ड्रन्स अकादमीने सुरुवातीपासूनच अाक्रमक खेळ करत प्रतिस्पर्ध्यांवर दडपण अाणण्यास सुरुवात केली. १८व्या मिनिटाला त्यांना त्याचे फळ मिळाले. वंश शाहने शानदार गोल करून चिल्ड्रन्स अकादमीचे खाते खोलले. त्यानंतर गुरुनानक हायस्कूलने बरोबरी करण्यासाठी जिकीरीचे प्रयत्न केले. पण चिल्ड्रन्स अकादमीच्या भक्कम बचावासमोर त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. वंश शाहचा गोल विजेतेपदासाठी निर्णायक ठरला. सेंट एलियस अाणि चिल्ड्रन्स अकादमी या विजेत्या संघांना प्रत्येकी ११ हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात अाले.


सेंट एलियसचे वर्चस्व

खारच्या मुलींनी सुरुवातीपासूनच खेळावर अापले वर्चस्व निर्माण केले अाणि सेंट तेरेसा हायस्कूलचा ४-० असा धुव्वा उडवला. माधवी म्हात्रे हिने पाचव्या मिनिटाला खाते खोलल्यानंतर हर्षदा धानीवले हिने सातव्या मिनिटाला गोल करून दिल्यामुळे सेंट एलियसने सुरुवातीलाच २-० अशी महत्त्वपूर्ण अाघाडी घेतली होती. अाराधना जाधव हिने २४व्या मिनिटाला तिसऱ्या गोलची भर घातली. पाच मिनिटानंतर माधवी म्हात्रे हिने अाणखी एक गोल करत सेंट एलियसच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.


हेही वाचा -

ब्रेबाॅर्न स्टेडियममध्ये सौरउर्जा प्रकल्पाची उभारणी

मुंबईकर अभिषेक नायर पुद्दुचेरीकडून खेळणार



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा