काळ्या-पांढऱ्या सोंगट्यांचा थरार

Shivaji Park, Mumbai  -  

दादर - दहा बाय दहाचा बोर्ड. लाल राणी आणि काळ्या-पांढऱ्या सोंगट्या, त्यांना काबीज करणारा स्ट्रायकर आणि स्ट्रायकरवर स्थिर डोळे. ही दृश्य आहेत राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेतील. दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्यामध्ये 11 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी असे 3 दिवस कॅरम स्पर्धा भरवण्यात आली होती. या कॅरम स्पर्धेत महाराष्ट्रातून 547 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. पुरुष गटातून संदीप दिवे यांनी विजेतेपद पटकावले. महिला गटातून विजेता म्हणून आयेशा मोहम्मद तर उपविजेता म्हणून स्नेहा मोरे यांनी बाजी मारली. या वेळी जिमखान्याचे अध्यक्ष सुप्रसिद्ध क्रिकेटर प्रवीण आमरे, जी नॉर्थचे सहायक आयुक्त रमाकांत बिरादार, आंतरराष्ट्रीय कॅरम विजेता प्रशांत मोरे यांच्या उपस्थितीत बक्षीस समारंभाचा कार्यक्रम पार पडला.

या वेळी कॅरम प्रेमींसाठी एक आनंदाची घोषणाही करण्यात आली. लवकरच 'कॅरम बीट' नावाने मोबाइल अॅप बाजारात येणार आहे. आणि त्यामध्ये गल्ली पासून ते आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेची माहिती तुम्हाला मिळणार आहे.

Loading Comments