सोनी पिक्चर्सचा विजय

 Mumbai
सोनी पिक्चर्सचा विजय

कलिना - टाटा मोटर्स कॉर्पोरेट क्रिकेट टुर्नामेंट 2017 मध्ये सोनी पिक्चर्स संघाने विजय मिळवलाय. कलिनातल्या एअर इंडिया मैदानात गुरुवारी टीसीएसविरोधात झालेल्या या सामन्यात सोनी पिक्चर्स संघातील प्रतिक पाटीलने अर्धशतक झळकावले.

टीसीएसने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या संघातील तीन महत्त्वाचे फलंदाज लवकर बाद झाल्याने टीसीएसला 10 षटकांत 7 बाद 101 धावाच करता आल्या. तर सोनी पिक्चर्सने नऊ गडी राखत अवघ्या आठ षटकांत सामना आटोपता घेतला.

Loading Comments