टेबल टेनिस टुर्नामेंटमध्ये टाटा कन्सल्टन्सीने मारली बाजी

  Khar
  टेबल टेनिस टुर्नामेंटमध्ये टाटा कन्सल्टन्सीने मारली बाजी
  मुंबई  -  

  खार - कॉर्पोरेट टेबल टेनिस टुर्नामेंटच्या अंतिम सामन्यात टाटा कन्सल्टन्सी लिमिटेडच्या खेळाडूंनी बाजी मारली आहे. खार जिमखाना येथे झालेल्या या अंतिम सामन्याच्या मिश्र दुहेरीत विशाल यादव-अपेक्षा भागवत या जोडीने अंतिम फेरीत 11-9, 11-7, 11-5 असा विजय मिळवला आहे. यापूर्वी झालेल्या उपांत्य फेरीत अपेक्षा आणि विशालने रिलायंस इंडस्ट्रिजच्या आयुशी बन्सल आणि गौतम बत्रा या जोडीचा 11-9,11-5,11-6 असा पराभव केला होता. त्यानंतर महिला एकेरीमध्ये अपेक्षाने 'बँक ऑफ अमेरिका'च्या अनीता राजला 11-8,11-7, 11-7 असे पराभूत करत एक नवीन खिताब अपल्या नावे केला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.