सचिन बनला गायक

 Mumbai
सचिन बनला गायक
Mumbai  -  

मुंबई - नेहमी क्रिकेटर म्हणून आपल्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सचिन तेंडुलकर आता गायक म्हणून आपल्या चाहत्यांसमोर आलाय. नुकतेच त्याने 'क्रिकेट वाली बीट' हे गाणं आपल्या ट्विटर अकांऊटवर पोस्ट देखील केलं आहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्या चाहत्यांना पहिल्यांदाचा गायनातून मंत्रमुग्ध केले आहे. सध्या हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. सोनू निगम आणि सचिन तेंडुलकरने हे गाणे गायले आहे. या गाण्याचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे त्याने यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या भारतीय क्रिकेटपटूंची नावं घेतली आहे. त्यात कपिल देव, संजय मांजरेकर, सौरभ गांगुली, राहुल द्रविड, व्ही.व्ही. एस. लक्ष्मण, महेंद्रसिंह धोनी, तसेच आपला बालपणीचा मित्र विनोद कांबळी याचा देखील उल्लेख यात केलेला आहे. यांच्या कामगिरीचे कौतुक या गाण्यातून सचिनने केले आहे.

(curtesy, sachin tendulkar you tube channel)

Loading Comments