ठाण्याच्या राहुल सिंगचा राज्य बाॅक्सिंग स्पर्धेत सुवर्णपंच

टिटवाळा येथील विनायक बाॅक्सिंग क्लबचा बाॅक्सर असलेल्या राहुल सिंगनं ४८ ते ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत मुंबई उपनगरच्या विकी कुमावतला पराभूत करून सुवर्णपदकावर नाव कोरलं.

SHARE

पुणे जिल्ह्यातील लोणी-काळभोर येथील एमअायटी विश्वविद्यालयाच्या प्रांगणात रंगलेल्या कुमार गटाच्या राज्य अजिंक्यपद बाॅक्सिंग स्पर्धेत ठाण्याचा बाॅक्सर राहुल सिंग याने सुवर्णपदकाला गवसणी घालत दैदीप्यमान यश संपादन केलं. टिटवाळा येथील विनायक बाॅक्सिंग क्लबचा बाॅक्सर असलेल्या राहुल सिंगनं ४८ ते ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत मुंबई उपनगरच्या विकी कुमावतला पराभूत करून सुवर्णपदकावर नाव कोरलं.पहिल्याच फेरीत जिंकल्या लढती

ठाण्याच्या मिलन वैद्य यांच्याकडे बाॅक्सिंगचं प्रगत शिक्षण घेणाऱ्या राहुल सिंगनं या गटातील सर्व लढती पहिल्याच राऊंडमध्ये जिंकल्या. पहिल्याच फेरीत त्याने पुण्याच्या अंशुल चव्हाणला गारद केलं. त्यानंतर साताऱ्याच्या सुमित घाडगेला जोरदार पंच लगावत पहिल्याच फेरीत नामोहरम केलं. अंतिम फेरीतही विकी कुमावतला जोरदार ठोशे लगावल्यामुळे पंचांना पहिल्याच फेरीत ही लढत थांबवावी लागली अाणि राहुल सिंगला विजयी घोषित करावं लागलं.कठोर मेहनतीचं फळ

टिटवाळा येथे राहणारा राहुल दररोज सकाळी ६ वाजता नित्यनेमाने ठाणे येथे सरावासाठी हजर असतो. सरावातही त्याच्यात प्रचंड शिस्त अाणि वचनबद्धता अाहे. कठोर मेहनतीनेच त्याला हे फळ मिळाले अाहे. ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणारा एकमेब बाॅक्सर असलेल्या राहुल सिंगचे अाता लक्ष्य असेल ते खेलो इंडिया स्पर्धेत खेळण्याचे, असे त्याचे प्रशिक्षक मिलन वैद्य यांनी सांगितले.


हेही वाचा -

रमेश पोवारलाही व्हायचंय मुंबईचा प्रशिक्षक!

इंग्लंड दौऱ्यासाठी रहाणेचा मुंबईतच सराव!संबंधित विषय
ताज्या बातम्या