Advertisement

फेडरेशन चषक खो-खोत ठाण्याची प्रियांका भोपी ठरली सर्वोत्तम खेळाडू


फेडरेशन चषक खो-खोत ठाण्याची प्रियांका भोपी ठरली सर्वोत्तम खेळाडू
SHARES

हैदराबाद इथं झालेल्या २८ व्या फेडेरेशन चषक राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी सलग चौथ्यांदा विजेतेपदावर नाव कोरले असले तरी ठाण्याच्या प्रियांका भोपी हिने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला अाहे. पुरुषांमध्ये पुण्याच्या प्रतिक वाईकरने सर्वोत्तम खेळाडूचा मान प्राप्त केला.



अंतिम सामन्यात दाखवली चमक

महिलांच्या अंतिम सामन्यात तगड्या महाराष्ट्राने कर्नाटकचे अाव्हान १५-६ असे ९ गुणांच्या फरकानं सहज परतवून लावलं. प्रियांका भोपी हिनं ३.१० मिनिटे तसंच ४.१० मिनिटं संरक्षण करत २ गडीही बाद केले. तिला एेश्वर्या सावंत (२.२० मि., ३.१० मि. व २ गडी), कविता घाणेकर (२.१० मि., १.४० मि., व १ गडी) व काजल भोर (१.२० मि व ५ गडी) यांनी मोलाची साथ दिली.



पुरुषांमध्ये ठाण्याचा गजानन शेंगाळ चमकला

पुरुषांच्या अंतिम सामन्यात ठाण्याच्या गजानन शेंगाळनं चमक दाखवली. त्याच्या सुरेख कामगिरीमुळे महाराष्ट्राने तगड्या प्रतिस्पर्धी असलेल्या कोल्हापूरवर २२-१७ अशी ७ गुणांनी मात केली. गजानन शेंगाळनं १.१० मिनिटे तसेच १.२० मिनिटे संरक्षण करताना ४ गडी बाद केले. त्याला अक्षय भांगरे (१ मि नाबाद व १.३० मि) व महेश शिंदे (२ मि व २ गडी) यांनी चांगली साथ दिली.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा