SHARE

तायक्वांडो चॅम्पियनशीपमध्ये मुंबईच्या स्वराज स्पोर्ट्स फाउंडेशनच्या अंजिक्य परबला पराभवाचा सामना करावा लागला. तायक्वांडोच्या मुख्यालय असलेल्या कुक्कीवोन आणि रिपब्लिक ऑफ कोरियाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेली तायक्वांडो चॅम्पियनशीप भारत रत्न राजीव गांधी क्रीडा संकुल येथे खेळवण्यात आली. यावेळी बाल कल्याण विकास मंत्री पंकडा मुंडे देखील उपस्थित होत्या.


राहुल थापा विजयी

यामध्ये सिनियर क्योरुगी पुरुष गटात राहुल थापा याने बाजी मारत विजय मिळवला. या लढतीत सुरुवातीच्या पहिल्या फेरीत परब याने आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्धी थापावर तीन किक्स लावत ६ गुणांची कमाई केली. दरम्यान थापाने एक पंच देत एक गुणांची कमाई केली. नंतर झालेल्या दुसऱ्या फेरीत थापाने शानदार खेळ करत तीन किक्स मारत परबची आघाडी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आणि ४-६ अशी गुण संख्या मिळवली. थापाने आक्रमक खेळ करत आघाडी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. प्रतिस्पर्धी परबवर हल्ले चढवत त्याने शेवटच्या तीन गुणांची कमाई केली. शेवटच्या पाच सेंकदात आणखी एक गुण मिळवत ८-७ अशा फरकाने जेतेपदावर आपले नाव कोरले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या